'आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग प्रश्न विचारा' ; श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले | Shrikant Shinde
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले आहेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. याचविषयी अयोध्येतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारताना शिवसेना असा उल्लेख केला नाही त्यावर श्रीकांत शिंदे हे 'आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग तुमचा प्रश्न विचारा' असं म्हणाले